"अय्यप्पाचे भाविक हे दहशतवादी नाहीत"

"अय्यप्पाचे भाविक हे दहशतवादी नाहीत"

नवी दिल्ली-"केरळ सरकारने शबरीमला मंदिर परिसराचे युद्धभूमीत रूपांतर केले आहे. अय्यप्पा देवाचे भाविक हे दहशतवादी नाहीत, ते यात्रेकरू आहेत. त्यांना दरोडेखोरांसारखी वागणूक दिली जात आहे,'' अशा कडक शब्दांत केंद्रीय पर्यटनमंत्री के. अल्फोन्स यांनी राज्य सरकारला सोमवारी फटकारले.

शबरीमला पर्वतावरील सोई-सुविधांचा आढावा घेण्यासाठी अल्फोन्स यांनी आज निलाक्कल, पम्बा आणि सान्निध्यमला भेट दिली. निलक्कल या बेस कॅम्पला भेट दिल्यावर ते म्हणाले, की जेथे लोक शांततेत राहत आहे, तेथे त्यांनी (राज्य सरकार) जमाबंदीचे 144 कलम लागू केले आहे. शबरीमला येथे हे कलम लागू करण्याची गरज काय आहे. केंद्राने 100 कोटींचा निधी दिला, त्यांनी एक रुपयाही खर्च केला नाही. 

"अंमलबाजवणीसाठी वेळ द्या' 
केरळमधीस शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेश देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी त्रावणकोर देवस्वम मंडळाने (टीडीबी) सर्वोच्च न्यायालयाच्या अजून वेळ मागून घेतला आहे. या देवस्थानात मूलभूत सोयींचा अभाव असल्याचे व अन्य कारणेही यासाठी देण्यात आली आहेत. ऑगस्टमध्ये राज्याला पुराचा फटका बसला. या वेळी देवस्थानातील सर्व व्यवस्था कोलमडून पडली. येथे पुरेशी स्वच्छतागृहांचा अभाव आहे. त्यामुळे विशेषतः महिलांना याचा त्रास होऊ शकतो, असे देवस्थान मंडळाने म्हटले आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

दिवसभरातील घडामोडी 
- पोलिसांच्या कारवाईविरोधात भाजप, युवा मोर्चा आणि अन्य उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या कार्यकर्त्यांची राज्यभरात निदर्शने 
- युवा मोर्चाच्या दोन कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर उडी मारण्याचा प्रयत्न 
- तिरुअनंतपुरममधील सचिवालयावक कार्यकर्त्यांचा मोर्चा 
- शबरीमलावर ताबा मिळविण्यासाठी आरएसएस "खलिस्तान'च्या धर्तीवर आंदोलन करीत असल्याचा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आरोप 
- सरकारची पोलिस कारवाई निष्ठुर असल्याचा राज्य भाजपचा आरोप. न्यालालयीन चौकशीची मागणी 
- भाविकांचा "नामजपा'चा जयघोष करीत परिसरात ठिय्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com