आदित्यनाथ, तुम्ही नमाज अदा करणार का? - आझम खान

Azam Khan asks Adityanath Yogi if he would offer namaz
Azam Khan asks Adityanath Yogi if he would offer namaz

नवी दिल्ली : नमाज आणि सूर्य नमस्कारांची तुलना करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी टीका केली आहे. 'सूर्य नमस्कार आणि नमाज सारखेच असल्याचे म्हणणारे योगी आदित्यनाथ नमाज अदा करणार  का?', असा प्रश्‍न खान यांनी उपस्थित केला आहे.

बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना आदित्यनाथ म्हणाले की, "सूर्य नमस्कारातील सर्व आसने, प्राणायामाची कृत्ये नमाजप्रमाणेच आहेत. जे लोक योगाला विरोध करीत आहेत त्यांना धार्मिक मुद्यांवरून समाजात फूट पाडायची आहे.' या पार्श्‍वभूमीवर 'जर तुम्हाला नमाज आणि सूर्यनमस्कारामध्ये साम्य आढळत असेल तर तुम्ही नमाज अदा करणार का?' असे म्हणत खान यांनी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यामागील हेतूवर शंका उपस्थित केली.

उत्तर प्रदेशमधील कत्तलखान्यांवर होत असलेल्या कारवाईबाबत बोलताना खान म्हणाले, "मुस्लिमांना शाकाहारी पदार्थ खाण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे. सिंह कधीही गवत खात नसतो. मात्र जर त्याला जगायचे असेल तर त्याला ते खावे लागते.' राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचविले आहे. याबाबत बोलताना "ज्याच्याकडे बहुमत आहे, तो हे पद जिंकेल', अशा प्रतिक्रिया खान यांनी व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com