मी भाजपची आयटम गर्ल; मोदींमुळे लष्कराचे धैर्य खचले- आझम खान

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

माझ्यामुळे लष्कराचे धैर्य कसे खचते?
- आझम खान

लखनौ : 'मी भाजपची आयटम गर्ल आहे. माझ्यावर फोकस करूनच त्यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकल्या,' तसेच, "पंतप्रधान मोदी पाकला गेले तेव्हाच लष्कराचे मनोधैर्य खचले. मी कोणीही नाही," असा टोला आझम खान यांनी लगावला. 

'माझ्या विधानाचा माध्यमांनी विपर्यास केला,' असे सांगत 'माझ्यामुळे लष्कराचे धैर्य कसे खचते,' असा सवाल समाजवादी पक्षाचे  नेते आझम खान यांनी केला. भाजप पक्ष जाणीवपूर्वक माझी बदनामी करत आहे, असा आरोप त्यांनी केला. 

"जम्मू-काश्‍मीरसह देशाच्या इतर भागांमध्ये लष्कराचे जवान महिलांवर बलात्कार करतात. याचा सूड घेण्यासाठी संतप्त महिलांकडून जवानांचे गुप्तांग कापण्यात येते,' असे धक्कादायक विधान खान यांनी रामपूर येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना केले होते. आझम खान यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना खान यांनी वरील स्पष्टीकरण दिले. 

खान म्हणाले, "मी भाजपची आयटम गर्ल आहे. ज्याच्याबद्दल बोलावं असं दुसरं कोणी त्यांच्याकडे नाही. त्यांनी येथील निवडणुकासुद्धा माझ्यावरच फोकस करून लढल्या."
 

Web Title: azam khan blames narendra modi's pakistan visit demoralized indian army