आझम खान यांना जामीन मंजूर; मात्र, तुरुंगाबाहेर येण्याबाबत साशंकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Azam Khan granted bail

आझम खान यांना जामीन मंजूर; मात्र, तुरुंगाबाहेर येण्याबाबत साशंकता

सपाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री आझम खान (Azam Khan) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने (High Court) जामीन मंजूर केला आहे. ५ मे रोजी न्यायालयाने वक्फ बोर्ड जमीन प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी यांनी खुल्या न्यायालयात हा निकाल दिला. मात्र, आझमच्या तुरुंगातून बाहेर येण्याबाबत साशंकता कायम आहे. आझम खान यांच्याविरोधात तीन दिवसांपूर्वी नोंदवलेल्या शाळांच्या मान्यतेसंदर्भातील प्रकरणात तुरुंगात नोटीस बजावण्यात आली आहे. (Azam Khan granted bail)

५ मे रोजी आझम खान (Azam Khan) यांच्या वतीने अधिवक्ता इम्रान उल्ला आणि सरकारच्या वतीने अतिरिक्त महाधिवक्ता एमसी चतुर्वेदी यांना तीन तास चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. त्याआधी ४ डिसेंबर २०२१ रोजी न्यायालयाने अनेक दिवसांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.

हेही वाचा: पंजाबमध्ये ‘लष्कर-ए-खालसा’ गट स्थापन; आयएसआयचा मोठा कट?

गेल्या महिन्यात सरकारने या खटल्याच्या संदर्भात काही नवीन तथ्ये मांडण्यासाठी अर्ज दिला होता. त्यानंतर ५ मे रोजी पुन्हा जामिनावर सुनावणी झाली. विशेष म्हणजे २०१९ पासून आझम खानवर ९० खटले दाखल झाले आहेत. त्यापैकी ८८ प्रकरणांमध्ये त्यांना जामीन देण्यात आला आहे. यातील एक गुन्हा गेल्या आठवड्यात नोंदवण्यात आला होता. त्या प्रकरणी तुरुंगातही शिक्षा झाली आहे. अशा परिस्थितीत आझम यांना (Azam Khan) आता त्या प्रकरणातही जामीन (granted bail) घ्यावा लागणार असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Azam Khan Granted Bail High Court Samajwadi Party

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top