तोंडी तलाक बंद करण्यापूर्वी सती प्रथा लागू करा : आझम खान

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

तोंडी तलाकसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केल्याच्या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. तोंडी तलाकबाबत बोलताना 'मुस्लिमांनी सती प्रथेला विरोध केला आहे का?' असा प्रश्‍न उपस्थित करत 'आधी सती प्रथा सुरू करा', असे वक्तव्य केले आहे.

रामपूर (उत्तर प्रदेश) : तोंडी तलाकसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केल्याच्या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. तोंडी तलाकबाबत बोलताना 'मुस्लिमांनी सती प्रथेला विरोध केला आहे का?' असा प्रश्‍न उपस्थित करत 'आधी सती प्रथा सुरू करा', असे वक्तव्य केले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना खान म्हणाले, "तोंडी तलाकसंदर्भात कायदा बनविण्यापासून तुम्हाला कोणी रोखले आहे. पण आधी मला सांगा की मुस्लिमांनी सती प्रथेला विरोध केला आहे का? सती प्रथा हा हिंदू संस्कृतीतील एक भाग आहे. ती आधी लागू करा.'

आदित्यनाथ यांनी 'तोंडी तलाक'च्या मुद्यावर काही जणांनी पाळलेले मौन पाहून आश्‍चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. याचबरोबर, तोंडी तलाकच्या मुद्यासंदर्भात मौन पाळणारेही दोषीच असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली होती.

काय आहे 'सती प्रथा'?
'सती प्रथा' ही हिंदू धर्मातील काही समुदायांमध्ये पूर्वी प्रचलित प्रथा होती. पतीचे निधन झाल्यानंतर विधवा पत्नीने पतीच्या अंतिम संस्कारादरम्यान त्याच्या जळणाऱ्या चितेत उडी मारून आत्मदहन करून मृत्यू पत्करण्याची पद्धत म्हणजे सती प्रथा समजली जात होती. विधवा महिलेने चितेत उडी मारल्यावर तिच्या वेदनांचा आवाज येऊ नये म्हणून ढोल वाजविण्याची पद्धत होती. ही प्रथा बंद करण्यासाठी राजा राम मोहन रॉय यांनी प्रयत्न केले.

Web Title: Azam Khan spews controversy over triple talaq, calls for reinstatement of 'sati pratha'