रामदेवबाबांवर संक्रांत; पतंजलीचे 'अच्छे दिन' संपले

वृत्तसंस्था
शनिवार, 29 डिसेंबर 2018

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समूहाचे 'अच्छे दिन' संपल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. पतंजलीला गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच तोटा झाला असल्याचे समोर आले आहे. 2013 पासून आतापर्यंत नफ्यात असणाऱ्या पंतजलीच्या विक्रीत यावर्षी घसरण झाल्यामुळे नफ्यातही फटका बसला आहे. पतंजलीला अनेक कंपन्यासोबत जीएसटीचा फटका बसला आहे.

नवी दिल्ली- योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समूहाचे 'अच्छे दिन' संपल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. पतंजलीला गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच तोटा झाला असल्याचे समोर आले आहे. 2013 पासून आतापर्यंत नफ्यात असणाऱ्या पंतजलीच्या विक्रीत यावर्षी घसरण झाल्यामुळे नफ्यातही फटका बसला आहे. पतंजलीला अनेक कंपन्यासोबत जीएसटीचा फटका बसला आहे.

जीएसटी या नव्या करप्रणालीमुळे वितरण व्यवस्थेत समस्या निर्माण झाल्याचा फटका पतंजलीला बसला आहे. केअर रेटिंग्ज या संस्थेच्या अहवालानुसार, पतंजलीने जीएसटीचा वेळेत स्वीकार केला नाही, तसेच त्यासाठीच्या योग्य त्या पायाभूत सोयी आणि वितरण साखळी निर्माण केली नाही, याचाही फटका पतंजलीला बसला आहे. तसेच, नैसर्गिक आणि वनौषधी उत्पादन क्षेत्रात बहुतांश बहुराष्ट्रीय कंपन्या उतरल्यामुळे मार्च 2018 ला संपलेल्या वित्त वर्षात पतंजली आयुर्वेद कंपनीची विक्री आणि नफा यात मोठी घट झाली आहे. याचा मोठा फटका बसून कंपनीची उलाढाल घटली आहे.

संशोधन संस्था टॉफलरने 2017-18 वित्त वर्षात पतंजली समूहाचा महसूल 10 टक्क्यांनी घटून 8135 कोटी रुपयांवर आला. 2016-17 मध्ये तो 9030 कोटी रुपये होता. कंपनीचा नफाही अर्ध्यापेक्षा जास्त कमी होऊन 529 कोटी रुपयांवर आला. आदल्या वर्षी तो 1190 कोटी रुपये होता. गेल्या पाच वर्षात म्हणजे 2013 पासून पतंजलीच्या नफ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच घट झाली नव्हती.

Web Title: Baba Ramdev Patanjali Sales Growth Down In Fiscal Year