देशातील काळा पैसा आला, आता विदेशातील येईल: रामदेवबाबा

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी काळा पैसा परत आणण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करत आहेत. सध्या देशातील काळा पैसा बाहेर आला असून आता विदेशातील काळा पैसा आणण्यात येणार आहे, असा दावा योगगुरू रामदेवबाबा यांनी केला आहे.

रामदेवबाबा तीन दिवसांच्या छत्तीसगढ दौऱ्यावर आहेत. आज (गुरुवार) स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी ते दुर्ग येथे आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "भ्रष्टाचार संपविविण्यासाठी आणि काळा पैसा परत आणण्यासाठी मोदी प्रयत्नशील आहेत. सध्या देशातील काळा पैसा परत आला असून आता विदेशातील पैसा परत आणण्यात येईल.'

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी बुधवारी एका कार्यक्रमात मोदींवर टीका केली होती. याबाबत बोलताना रामदेवबाबा म्हणाले, "राहुल गांधी हे पंतप्रधानांचे अर्थसल्लागार नाहीत किंवा ते विदेशातून शिकून आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. यापूर्वी ते म्हणाले होते की मोदींना योगा करता येत नाही. मात्र, मोदींना योगातील आसने आणि 'सिंहासन' दोन्ही चांगल्या पद्धतीने येते', अशी टीका त्यांनी केली.

मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय हा रामदेवबाबा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सल्लावरून  घेतल्याचा आरोप राहुल गांधी यांनी बुधवारी केला आहे. हा निर्णय घेताना कोणत्याही अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेतला नसल्याचा आरोपही गांधी यांनी केला आहे.

Web Title: Baba Ramdev says after black money come to country now turn of abroad