Indian Population: लोकसंख्या नियंत्रणावर रामदेवबाबांचा खास सल्ला! "तरच होणार देशाची प्रगती.. " | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Population

Indian Population: लोकसंख्या नियंत्रणावर रामदेवबाबांचा खास सल्ला! "तरच होणार देशाची प्रगती.. "

योगगुरू रामदेव बाबा यांनी पुन्हा एकदा लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर भाष्य केलं आहे. "आता देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करायला हवा.

देशाची सध्याची परिस्थिती पाहता लोकसंख्येचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे, त्यामुळे देशाच्या संसदेत लोकसंख्या नियंत्रणाबाबत कायदा करणे अत्यंत गरजेचे झाले आहे" असं रामदेव बाबा यांनी भाष्य केलं.

योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, लोकसंख्या 140 कोटींवर पोहोचली आहे आणि देश यापेक्षा जास्त भार उचलू शकणार नाही. रेल्वे, विमानतळ, कॉलेज, विद्यापीठात तेवढ्याच लोकांना रोजगार देऊ शकलो तरी पुरेसं आहे.

लोकसंख्या नियंत्रण कायदाही देशाच्या संसदेत झाला पाहिजे, तरच आपण देशाच्या संसाधनांचा योग्य वापर करू शकू. देशावर अतिरिक्त बोजा होता कामा नये.

पंतप्रधान मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली

उत्तराखंडला पहिली वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार व्यक्त करताना रामदेव बाबा म्हणाले,

'दिल्ली-डेहराडून मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होत आहे, ही हरिद्वार उत्तराखंडसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधानांनी देवभूमीला एक मोठी भेट दिली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे कृतज्ञता व्यक्त करतो.

आधीच मागणी केली आहे

स्वामी रामदेव यांनी लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर बोलण्याची पहिलीच वेळ नाही. हा मुद्दा त्यांनी यापूर्वीही अनेकदा मांडला आहे.

दोन अपत्यांनंतर जन्मलेल्या मुलाला मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा अधिकार आणि इतर सरकारी सुविधांपासून वंचित ठेवलं पाहिजे, असं त्यांनी काही वेळापूर्वी म्हटलं होतं.

देशाची लोकसंख्या ज्या प्रकारे वाढत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत भारताची लोकसंख्या 150 कोटींच्या वर जाऊ नये यासाठी भारत तयार नाही, असे स्वामी रामदेव म्हणाले.