'पाक कलाकार भारतात कमवून बिर्याणी खातात'

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

पाकिस्तानमध्ये पतंजली उभारण्यास तयार आहे. योगा ही एक कला आहे. परंतु, पाकिस्तानी कलाकारांसारखे नुसते कमावणारच नाही तर पाकिस्तानी नागरिकांच्या भल्यासाठीसुद्धा काम करले.
- रामदेवबाबा

नवी दिल्ली- पाकिस्तानी कलाकार दहशतवादी नसले तरी ते फक्त आपल्याच चित्रपटाचा विचार करतात. भारतामध्ये येऊन कोट्यावधी रुपये कमावतात अन् बिर्याणी खातात. दहशतवादी हल्ल्यानंतर ते काहीच बोलत नाहीत, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी म्हटले आहे.

एका कार्यक्रमादरम्यान रामदेवबाबा यांना पाकिस्तानी कलाकारांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'पाकिस्तानी कलाकार उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्लाबाबत व भारतीय जवानांबाबत काहीच का बोलत नाहीत. येथे येऊन ते पैसे कमावतात अन् बिर्याणी खातात.'

'पाकिस्तानमध्ये पतंजली उभारण्यास तयार आहे. योगा ही एक कला आहे. परंतु, पाकिस्तानी कलाकारांसारखे नुसते कमावणारच नाही तर पाकिस्तानी नागरिकांच्या भल्यासाठीसुद्धा काम करले,' असेही रामदेवबाबा म्हणाले.

दरम्यान, उरी येथील ह्लल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने पाकिस्तानी कलाकारांना देशातून निघून जाण्याचा इशारा दिला होता. यानंतर पाकिस्तानी कलाकार लगेच परत गेले आहेत. मात्र, पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी नसून दहशतवादी व कलाकारांमध्ये फरक आहे, असे सांगत अभिनेता सलमान खान याने पाकिस्तानी कलांकारांना पाठिंबा दिला आहे. सलमान खानबरोबरच निर्माता करण जोहर व अनुपम खेर यांनी पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा दिला आहे. परंतु, नाना पाटेकर, हेमा मालिनी, रितेश देशमुख, अजय देवगन व साजिद खान यांनी पाकिस्तानी कलाकारांना विरोध केला आहे.

Web Title: baba ramdev slams pakistani actors