Baba Ramdev News : बाबा रामदेव १०० तरुण-तरुणींना देणार संन्यास; अमित शाह, CM योगी राहणार उपस्थित | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdev Baba News

Baba Ramdev News : बाबा रामदेव १०० तरुण-तरुणींना देणार संन्यास; अमित शाह, CM योगी राहणार उपस्थित

Ramdev Baba News: योग गुरू बाबा रामदेव रामनवमीच्या दिवशी १०० लोकांना संन्यासाची दिक्षा देणार आहेत. यासाठी पतंजली योग पीठाद्वारे बुधवार नव संवत्सर चैत्र नवरात्री निमीत्त भव्य संन्यास दीक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात ४० महिला आणि ६० पुरूष रामनवमीच्या दिवशी बाबा रामदेव यांच्या कडून दीक्षा घेतील, यासोबत तब्बल ५०० महिला आणि पुरूषांना रामदेव यांच्या सहकारी आचार्य बालकृष्ण ब्रम्हचर्याची दीक्षा देणार आहेत.

या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहाणार आहेत.

हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देव गिरी यांच्या उपस्थितीत संन्यास दीक्षा सोहळ्याला सुरुवात झाली. रामनवमीला संन्यास दीक्षेनंतर दुसऱ्या दिवशी आशीर्वादाचा कार्यक्रम होईल. स्वामी गोविंद देव यांनी संन्यास परंपरेत दीक्षा घेतलेल्यांना संबोधित करताना म्हणाले की, वैदिक परंपरेतील सर्वोच्च पुष्प म्हणजे संन्यास होय.(Latest Marathi News)

संन्यासीला वाटले पाहिजे की तो भगवंताच्या रूपात सृष्टीच्या सेवेसाठी समर्पित आहे. रामनवमीच्या दिवशी चार वेदांच्या महापारायण यज्ञाच्या पूर्ततेबरोबरच नवीन तपस्वींना प्राचीन ऋषींच्या संन्यास परंपरेची दीक्षा दिली जाईल, अशी माहिती बाबा रामदेव यांनी दिली.

पतंजलीमध्ये स्त्री-पुरुष , जात, धर्म, पंथ, धर्म असा कुठलाही भेद नाही असेही त्यांनी यावेळी सांगीतलं.

आचार्य बालकृष्ण म्हणाले की, खऱ्या सनातन वैदिक परंपरेचा सांस्कृतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी पतंजलीतर्फे अनेक वैदिक गुरुकुले चालवली जात आहेत. प्राचीन धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करून आपण सक्षम विद्वान आणि अभ्यासक म्हणून तयार होत आहोत. (Marathi Tajya Batmya)

या वेळी साध्वी देवप्रिया, भारतीय शिक्षण मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष एन.पी.सिंग, अजय आर्य, बाबू पद्मसेन, राकेश कुमार, स्वामी परमार्थदेव, स्वामी अर्शदेव आदी उपस्थित होते.

पुढील वर्षी जानेवारीत राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे बाबा रामदेव यांनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले की, कलम ३७० ही संपले आहे. आता समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा शिल्लक आहे.

हे दोन्ही कायदे 2024 पर्यंत लागू होण्याची अपेक्षा आहे. राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंद देव म्हणाले की, राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. पुढील वर्षी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात भगवान श्रीरामाच्या मूर्तीची जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.