बाबरी मशीद विध्वंस प्रकरण : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

बाबरी पाडण्याचा कट पूर्वनियोजित नव्हता असं न्यायालयाने म्हटलं. या प्रकरणात सीबीआयने केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत आणि सबळ पुराव्या अभावी न्यायालयानं 32 आरोपींची मुक्तता केली.

लखनऊ - बाबरी विध्वंस प्रकऱणातील खटल्याचा निकाल सीबीआय़च्या विशेष न्यायालयाने दिला असून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी पाडण्याचा कट पूर्वनियोजित नव्हता असं न्यायालयाने म्हटलं. या प्रकरणात सीबीआयने केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत आणि सबळ पुराव्या अभावी न्यायालयानं 32 आरोपींची मुक्तता केली. 

बाबरी पाडण्याची घटना पूर्वनियोजित नव्हती असं न्यायालयाने सांगतिलं. ही कृती अचानक घडली होती आणि तो एक अपघात होता असं सांगत न्यायालयाने 28 वर्षांपासून सुरु असलेल्या या खटल्याचा निकाल दिला. 

वादग्रस्त भाग पाडल्याप्रकरणी आरोप करण्यात आला होता. या प्रकऱणात कोणत्याही ठोस साक्षी नव्हत्या. या खटल्यात भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यावर सीबीआयने आरोप केले होते.

सीबीआय याविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करणार का? असा प्रश्न आहे. 

 

दरम्यान, या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण आडवाणी यांचे भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी अभिनंदन केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Babri Masjid demolition case All accused acquitted by Special CBI Court