जेटलींच्या अंत्यसंस्कारावेळी नेत्यांचे मोबाईल चोरीला

वृत्तसंस्था
Tuesday, 27 August 2019

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी 11 मोबाईल चोरी झाले आहेत. रविवारी निगमबोध घाटावर जेटली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जेटलींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोबाईल चोऱ्यांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे मोबाईल चोरीला गेल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी 11 मोबाईल चोरी झाले आहेत. रविवारी निगमबोध घाटावर जेटली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जेटलींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोबाईल चोऱ्यांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे मोबाईल चोरीला गेल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांचाही यामध्ये मोबाईल चोरीला गेला असल्याचे समजले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच ते सर्व फोन ट्रॅकिंगवर लावले असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान ही चोरी नाही, तर खूप चलाखीने आपले खिसे कापले असल्याचे सांगण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Babul Supriyo Among 11 Whose Phones Stolen At Arun Jaitley's Funeral