बाळाला जमिनीवर आपटल्याचा व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

हैदराबादः पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणानंतर एक महिन्याच्या बाळाला हिसकावून घेत जमिनीवर आपटल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हॉयरल झाला असून, अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.

हैदराबादमधील एका रस्त्यावर पती-पत्नीमध्ये भांडण सुरू होते. रागाच्या भरामध्ये महिलेने आपल्या एक महिन्याच्या बाळाला हिसकावून जमिनीवर आपटले. यावेळी घटनास्थळी असलेल्यांनी मोबाईलमध्ये भांडण कैद करून सोशल मीडियावर व्हॉयरल केले आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांमधूनही हे वृत्त दाखविले जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिला पतीसोबत जोरजोरात भांडताना दिसत आहे. पती त्यावेळी तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असता महिला त्याचा पाठलाग करत होती. शिवाय, बाळाला पतीकडे सोपवण्याचाही प्रयत्न करत होती. यानंतर महिला अचानक बाळाला खेचून घेते आणि जमिनीवर आपटते. यानंतर पती बाळाला उचलून घेत पत्नीला मारहाण करताना दिसत आहे. मात्र, यावेळी बाळाकडे मात्र कोणाचे लक्ष नव्हते. अखेर एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने बाळाला ताब्यात घेतले आणि रुग्णालयात दाखल केले आहे.

जमिनीवर आपटलेले मूल आपले नसल्याचे पतीचे म्हणणे होते, यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Baby Knock Down To Road By Mother At Mehdipatnam hyderabad