esakal | प्राण्यांचा काळजाला भिडणारा व्हिडिओ व्हायरल...
sakal

बोलून बातमी शोधा

baby pigs save life of fish video viral on social media

कोरोनाच्या काळात माणूसकी हरवत चालली असताना प्राण्यांचा काळजाला भिडणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका माशाचा जीव वाचविण्यासाठी डुक्कराची पिले पुढे आली आणि त्यांनी माशाचा जीव वाचवला आहे.

प्राण्यांचा काळजाला भिडणारा व्हिडिओ व्हायरल...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्लीः कोरोनाच्या काळात माणूसकी हरवत चालली असताना प्राण्यांचा काळजाला भिडणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका माशाचा जीव वाचविण्यासाठी डुक्कराची पिले पुढे आली आणि त्यांनी माशाचा जीव वाचवला आहे.

...म्हणून वडिलांनी केली स्कूटरसारखी सायकल

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला असून, अवघ्या अकरा सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. मात्र तो काळजाला भिडणारा आहे. सध्या कोरोनाच्या काळात माणसं एकमेकांपासून दुर जाताना दिसत आहेत. अंत्यसंस्कारासाठी पुढे येताना दिसत नाहीत. पण, प्राण्यांचे जीवंत उदाहरण बरेच काही शिकवून जाते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मासा पाण्याबाहेर जमिनीवर पडला आहे. मासा तडफडत असताना डुकराची पिल्ले त्याच्या मदतीसाठी धावून येतात. माशाला पाण्यात नेण्यासाठी प्रयत्न करतात. डुक्कराची पिले आपल्या तोंडाने त्या माशाला हळूहळू पुढे ढकलत नेतात आणि अखेर त्याला पाण्यात पोहोचवतात.

दरम्या, या व्हिडिओने अनेकांची मनं जिंकली असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. "माणसांमधील माणुसकी संपली आहे, आता पशुपक्ष्यांमधील या माणुसकीचं उदाहरण द्यावे लागते. मासा मृत असो किंवा जिवंत. मात्र, डुकराच्या पिल्लांनी खूप चांगले काम केले आहे. हा व्हिडिओ म्हणजे कोरोना काळात रक्ताची नाती विसरलेल्या, आपल्या माणसांना विसरलेल्या आणि माणुसकी विसरलेल्यांसाठी एक मोठी चपराक आहे, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत.

प्रवासासाठी आता 'ई-पास' आणि क्वारंटाईन पण नाही...

loading image
go to top