दिल्ली मेट्रोला लकवा! 

दिल्ली मेट्रोला लकवा! 

नवी दिल्ली : रोज तब्बल 29 लाख प्रवाशांना वाहून नेणारी व राजधानीची जीवनवाहिनी मानली जाणारी जागतिक ख्यातीची दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा बिघडली आहे. यावेळचा बिघाड इतका गंभीर आहे, की ब्ल्यू लाइनवरील लाखो प्रवाशांना गेले किमान चार- पाच दिवस प्रचंड मनस्तापच सहन करावा लागतो आहे. पण दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ (डीएमआरसी) तरी करून करून करणार काय, कारण नेमका काय व कुठे बिघाड झालाय याचा तर त्यांनाही उलगडा होत नाही! आता मेट्रोचा बिघाड शोधण्यासाठी चक्क जर्मनीकडे झोळी पसरून त्यांच्याकडून सॉप्टवेअर तंत्रज्ञांची मदत घेण्याची वेळ दिल्ली मेट्रोवर आली आहे. 

ब्ल्यू लाइन मागिर्केला लकवा मारल्याची स्थिती आहे. येथील 12 मिनिटांच्या प्रवासासाठी किमान सव्वा तास लागतो आहे. काय बिघाड झाला याचीही लपवाछपवी मेट्रोकडून नेहमीप्रमाणे सुरू आहे. "सकाळ'ने मेट्रो मुख्यालयात जाऊन याबाबतची माहिती काढली तेव्हा ब्ल्यू लाइन मेट्रो मार्गावरील यावेळचा बिघाड हा एतद्देशीय सॉप्टवेअर तंत्रज्ञांच्या आकलन व आवाक्‍यापलीकडचा असल्याची कुणकूण लागली. मेट्रोने हे सॉप्टवेअर जर्मनीच्या मेसर्स सिमेन्स या जर्मन कंपनीकडून खरेदी केले होते, त्यामुळे आता त्यांच्याकडेच धाव घेण्याची वेळ दिल्ली मेट्रोवर आली आहे. 

दिल्ली मेट्रो ऍटोमॅटिक सिग्नलिंग प्रणालीवर धावते. ब्ल्यू लाइनवर या यंत्रणेची 17 इंटरलॉकिंग केंद्रे आहेत. त्यांची विभागणी आठ प्रमुख केंद्रांत करण्यात आली असून, खरी तांत्रिक गडबड येथेच झाली आहे. एखाद्या स्थानकावरून मेट्रो सुटते तेव्हा या प्रणालीने पुढच्या स्थानकावर त्याची आपोआप सूचना मिळते व संगणकीकृत केंद्रीकृत सर्व्हरच्या माध्यमातून त्याचे पुढील संचालन होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून ऍटोमॅटिक सिग्नलिंग प्रणालीने अघोषित बहिष्कार पुकारला आहे. यामुळे गाड्या प्रत्येक स्थानकावर मानवी प्रणालीने संचालित कराव्या लागत आहेत. हा बिघाड दूर करण्यासाठी आता जर्मनीकडे तांत्रिक मदत दिल्ली मेट्रोने मागितल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले. त्यांचे तंत्रज्ञ कधी येणार याचीही माहिती दिली जात नाही. 

29 लाख 
मेट्रोचे रोजचे प्रवासी 

12 लाख 
ब्ल्यू लाइनचे प्रवासी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com