केंद्राच्या निर्णयांमुळे सैन्याच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - केंद्र सरकारने भारतीय सैन्याच्या भावना दुखावल्याचा आरोप करत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. गेल्या काही दिवसांमध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे जवानांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होत असल्याचे राहुल यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

सीमेवर देशाचे रक्षण करण्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांची आपल्याला काळजी आहे, हे सरकारच्या कृतीतून दिसले पाहिजे, असेही राहुल यांनी पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन रॅंक वन पेन्शन (ओआरओपी) योजनेची अंमलबजावणी योग्यरीतीने करावी, जेणेकरून निवृत्त सैनिकांना पेन्शन मिळताना अडचणी येणार नाहीत, असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

सर्जिकल स्ट्राइकनंतर काही दिवसांनंतर अपंग सैनिकांसाठीच्या निवृत्तिवेतनासाठी नवे निकष लागू करण्यात आले. सातव्या वेतन आयोगाच्या रखडलेल्या अंमलबजावणीमुळेही सैन्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे सैन्य आणि नागरी कर्मचाऱ्यांतील कटूता वाढत आहे, असा आरोप राहुल यांनी पत्रात केला आहे.

एक जबाबदार लोकशाही म्हणून देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांपर्यंत प्रेम, पाठिंबा आणि कृतज्ञता पोचणे गरजेचे आहे. त्यासाठी जवानांना भरपाई, अपंग निवृत्तिवेतन आणि नागरी कर्मचाऱ्यांप्रमाणे समान अधिकार मिळणे गरजेचे आहे.
- राहुल गांधी, कॉंग्रेस उपाध्यक्ष

Web Title: Bad effect of centres decision on military