शौचालय उघड्यावर केल्यास मिळणार 'मौत की सजा'

वृत्तसंस्था
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

लखनौ : उत्तर प्रदेशात उघड्यावर शौचालय केल्यास 'मौत की सजा' दिली जाईल, असे होर्डिंग बागपत जिल्हा प्रशासनाने लावले आहे. या होर्डिंगबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त करतानाच हे तालिबानचे आदेश आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

बागपत जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या होर्डिंगवर 'अगर करोगे खुले मे शौच जल्दी दी जायेगी मौत' असा मजकूर लिहीला आहे. शहरातील विविध भागांमध्ये मंगळवारी (ता. 28) सकाळी हे होर्डिंग लावण्यात आले आहेत. संबंधित होर्डिंगचे छायाचित्र काढून अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले असून, याबाबत नागरिकांमध्ये घबराट असल्याचे म्हटले आहे.

तालिबान ज्या प्रकारे धमकी देते अगदी त्याच प्रमाणे बागपत जिल्हा प्रशासनाने 'मौत की सजा'ची धमकी दिली आहे. सरकारी योजनांची ते जबाबदारी पार पाडू शकत नसून, नागरिकांच धमक्या देत आहेत. प्रशासनाने अशा प्रकारची धमकी देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न नजरुद्दीन या ज्येष्ठ नागरिकाने उपस्थित केला आहे.

नागरिकांच्या नाराजीनंतर जिल्हा प्रशासनाने आपली चूक मान्य केली आहे. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जयप्रकाश यांनी सांगितले की, 'आम्ही प्रशासकीय अधिकाऱयांसोबत चर्चा केली आहे. प्रशासनाने हे होर्डिंग काढण्याचे काम सुरू केले आहे. आमच्याकडे कोणी लेखी तक्रार केल्यास कारवाई करू.'

Web Title: bagpat nagar palika hoarding for toilet at uttar pradesh