बहल यांनी आरोप फेटाळले 

बहल यांनी आरोप फेटाळले 

नवी दिल्ली (पीटीआय) : दिग्दर्शक विकास बहल यांनी लैगिंक शोषणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्‍टर्स असोसिएशन (आयएफटीडीए) ने पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीला आज विकास बहल यांनी उत्तर देत आपल्यावरील आरोप दुर्दैवी आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. 

प्रॉडक्‍शन हाउस फॅंटम चित्रपटात काम केलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने 2015 रोजी गोवा येथे बहल यांनी लैगिंक शोषण केल्याचा आरोप केला होता. दिग्दर्शक अनुराग कश्‍यप, विक्रमादित्य मोटवाने, मुथ मंटेना आणि विकास बहल हे फॅंटम चित्रपटाचे भागीदार होते. अलीकडेच हे प्रॉडक्‍शन हाउस बंद करण्यात आले. आयएफटीडीएकडून या महिन्याच्या प्रारंभी क्विनचे दिग्दर्शक बहल यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या संदर्भात त्यांनी उत्तर दिले असून, आपल्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत दोषी असल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत निर्दोष मानायला हवे. माझ्यावरील आरोप खोटे असून दुर्दैवी आणि निराधार असल्याचे बहल यांनी नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com