
UP मध्ये छोट्या पक्षांचा डाव; बसपने केली १० पक्षांसोबत युती
उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. यामुळे राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागलेला आहे. अशात बहुजन समाज पार्टीने (Bahujan samaj party) (BSP) दहा छोट्या पक्षांसोबत युती केली आहे. बसपचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी ही घोषणा केली आहे.
आदरणीय भगिनी श्रीमती मायावती जी यांच्या विकसित विचारांनी प्रेरित होऊन दहा राजकीय पक्षांनी बहुजन समाज पक्षाला पाठिंबा दिला आहे. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय या विचारधारेने पुढे जाण्याचा आणि काम करण्याचा संकल्प केला आहे, असे सतीश चंद्र मिश्रा म्हणाले. बसपला (Bahujan samaj party) भारत जनशक्ती पार्टी, परिवर्तन समाज पार्टी, विश्वशांती पार्टी, संयुक्त जनादेश पार्टी, आदर्श संग्राम पार्टी, अखंड विकास भारत पार्टी, सर्वजन आवाज पार्टी, आधी आबादी पार्टी, जागृत जनता पार्टी, सर्वजन यांचा पाठिंबा मिळाला आहे.
हेही वाचा: ...तरीही ते केंद्रात मंत्री कसे होतात; पाटील यांचा पवारांना टोला
तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने बहुजन समाज पक्षाला अधिक ऊर्जा आणि गती मिळेल. जनतेच्या आशीर्वादाने आम्ही बहेनजींना पाचव्यांदा मुख्यमंत्री बनवू. यामुळे उत्तर प्रदेश पुन्हा प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल, असेही सतीश चंद्र म्हणाले. बसपने (Bahujan samaj party) सुभासपा, रालोद आणि महान दल सारख्या पक्षांशी युती केली आहे.
छोट्या पक्षांशी युती करण्याची योजना
उत्तर प्रदेशचा (Uttar Pradesh) प्रमुख विरोधीपक्ष सपानेही विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) छोट्या पक्षांशी युती करण्याची योजना अवलंबली आहे. सपा प्रमुख (samajwadi party) अखिलेश यादव यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही मोठ्या पक्षाशी युती करणार नाही आणि छोट्या पक्षांना सोबत घेऊन मोठी सत्ता निर्माण करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
Web Title: Bahujan Samaj Party Samajwadi Party Uttar Pradesh Assembly Election Political News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..