"साऊथ पार्स' प्रकल्पाच्या देखरेखीसाठी आयोग

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 जुलै 2017

बैरुत - इराणवरील आर्थिक निर्बंध उठवल्यानंतरची सर्वांत मोठी गुंतवणूक फ्रान्समधील टोटल समूह करीत आहे. "साऊथ पार्स' या नैसर्गिक वायू क्षेत्राचा विकास टोटल करणार असून, या प्रकल्पाची देखरेख ठेवण्यासाठी इराणने सरकारी आयोग स्थापन केला आहे.

आयोगामध्ये न्यायसंस्थेचे सदस्य, संसदेच्या ऊर्जा आयोगाचे प्रमुख, तसेच, नियोजन व अर्थसंकल्प आयोगाचे प्रमुख यांचा समावेश असणार आहे. "साऊथ पार्स' प्रकल्प पाच अब्ज डॉलरचा असून, यातील पहिला टप्पा दोन अब्ज डॉलरचा आहे. या प्रकल्पातून नैसर्गिक वायूचे उत्पादन 40 महिन्यांत सुरू होणार आहे. या प्रकल्पात टोटलचा हिस्सा 50.1 टक्के असून, चीनमधील सरकारी मालकीची तेल व वायू कंपनी "सीएनपीसी'चा 30 टक्के आणि इराणमधील सरकारी मालकीच्या तेल कंपनीचा हिस्सा 19.9 टक्के असणार आहे. या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन दोन अब्ज घनफूट नैसर्गिक वायू अथवा चार लाख बॅरल कच्चे तेल एवढी आहे.

इराणचे पेट्रोलियम मंत्री बिजान झांगनेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, "साऊथ पार्स'चा विकसित न झाल्याने इराणला दरवर्षी 5 अब्ज डॉलरचा फटका बसत आहे. या प्रकल्पाला झालेल्या विलंबामुळे इराणला आतापर्यंत 22 अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे. टोटल इराणमध्ये गुंतवणूक करीत असल्याने अन्य विदेशी कंपन्यांही गुंतवणूक करण्यास पुढे येण्याची शक्‍यता आहे.

Web Title: bairut news sakal news marathi news international news