Doctor's Day : 'बजाज फिनसर्व'चा #OneLifeManyRoles माध्यमातून डॉक्टरांना सलाम

वृत्तसंस्था
रविवार, 30 जून 2019

- डॉक्टरांना मिळणार 32 लाखांपर्यंत वैयक्तिक आणि व्यवसाय कर्ज.

नवी दिल्ली : 'बजाज फिनसर्व' या बँकिंग क्षेत्रातील कंपनीकडून 'डॉक्टर्स डे'निमित्त ट्विटरवर मोहीम सुरु करण्यात आली. #OneLifeManyRoles अशाप्रकारे डॉक्टरांना त्यांच्या कार्याबद्दल सलाम केला जात आहे. 

1 जुलैला (उद्या) 'डॉक्टर्स डे' साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार #OneLifeManyRoles ही मोहीम सोशल मीडियावर सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी 'बजाज फायनान्स लिमिटेड'शी संबंधित 'बजाज फिनसर्व'ने 'डॉक्टर्स डे' दिवशी त्यांचा सन्मान करण्याचे ठरविले आहे. सोशल मीडियावर ही मोहीम 28 जून ते 4 जुलैपर्यंत चालणार आहे. तसेच डॉक्टरांना यामधून 'अॅमेझॉन इको डॉट'कडून काही गिफ्ट्सही मिळण्याची शक्यता आहे. शिवाय, जे डॉक्टर्स कर्ज घेण्यास पात्र असतील, अशा लोकांना 20 लाख रुपयांपर्यंत विमा मिळण्याची शक्यता आहे. 

तसेच बजाज फिनसर्व या बँकिंग कंपनीच्या माध्यमातून 32 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक किंवा व्यवसाय कर्ज मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय डॉक्टरांना गृहकर्ज आणि त्यांच्या मालमत्तेवर कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bajaj Finserv Salutes Medical Practitioners with OneLifeManyRoles Campaign