एअरस्ट्राइकनंतर उद्ध्वस्त झालेल्या बालाकोटमध्ये पुन्हा दहशतवादी सक्रीय

balakot surgical strike
balakot surgical strike

नवी दिल्ली - भारताने सर्जिकल स्ट्राइक करून पाकमधील बालाकोट इथल्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. आता पुन्हा या ठिकाणी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने त्यांच्या कंट्रोल रूम सुरू केल्या आहेत. गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कंट्रोल रूममधून प्रशिक्षित दहशतवाद्यांना मुजफ्फराबादच्या रस्त्याने घुसखोरी करण्यासाठी आदेश देत आहेत. पाकिस्तान आता अफगाणिस्तानमध्ये असलेल्या जैश ए मोहम्मदच्या अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांना हळू हळू काश्मीरमध्ये कारवाया करण्यासाठी शिफ्ट करत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुप्तचर विभागाच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, आत्मघाती हल्ला करण्याचा कट रचण्यासाठी बालाकोटमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी सक्रीय झाले आहेत. दहशतवादी कमांडर जुबैरने बालाकोटमध्ये जैशच्या हल्लेखोरांना पुन्हा ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली आहे. 

जैशचा कमांडर जुबैर हा बालकोटसह अफगाणिस्तानमध्येही तालिबानींसोबत सक्रीय आहे. पाकिस्तान सरकारने दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद वर घातलेल्या बंदीमधून सूट दिली आहे.

बालाकोटमधील प्रशिक्षण शिबिरांमध्ये आत्मघाती हल्ले करण्यासाठी दहशतवाद्यांची भरती केली जाते. 

मुज्जफराबादच्या सवाई नाला इथं असलेल्या जैशच्या तळावर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन हल्ल्यासाठी तयार केलं जात आहे. रिपोर्टनुसार, जैशच्या अल रहमत ट्रस्टच्या माध्यमातून या प्रशिक्षणासाठी दहशतवाद्यांना पैसे दिले जात आहेत.

भारताच्या हवाई दलाने बालाकोटमध्येच एअर स्ट्राइक केला होता. सरकारसह सैन्याने असा दावा केला होता की, या एअरस्ट्राइकमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामध्ये प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. मात्र पाकिस्तानने भारताचा हा दावा सतत फेटाळून लावला आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com