'बाळासाहेब प्रेमी' राम मंदिरासाठी दुचाकीवरून अयोध्येत

mohan yadav
mohan yadav

अयोध्या : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जिथे सभा असेल त्या प्रत्येक ठिकाणी ते हजर. पुढे 'बाळासाहेब प्रेमी' म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 25 आणि 26 नोव्हेंबरला 'चलो अयोध्या' हा नारा दिला अन् ते दुचाकीवरून अयोध्येत दाखल झाले.

मोहन यादव असे त्या 'बाळासाहेब प्रेमी' शिवसैनिकाचे नाव. यादव यांनी दुचाकीला भगवा रंग दिला आहे. शिवाय, त्यावर विविध घोषणाही लिहील्या आहेत. त्यावर फुले लावण्यात आली असून, त्यांची दुचाकी सर्वांचे लक्ष वेधून घेते. उद्धव ठाकरे यांनी 'चलो अयोध्या' हा नारा दिल्यानंतर राम मंदिराच्या उभारणीला चालना देण्यासाठी त्यांनी अयोध्येचा प्रवास सुरू केला. दहा दिवसांच्या प्रवासानंतर ते अयोध्येत दाखल झाले असून, त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अयोध्येकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी शिवनेरी किल्ल्यावरील मातीने भरलेला कलश सोबत नेला आहे.

मोहन यादव हे पुणे महापालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. परंतु, शिवसेनेचे काम करतो म्हणून आपल्याला आणि आपल्या मुलाला कामावरुन काढून टाकल्याचा त्यांचा आरोप आहे. सध्या ते किरकोळ कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पंचवीस वर्षांत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची एकही सभा चुकवली नाही. अगदी पायाला दुखापत झाली असतानाही. त्यांच्या मुलांनाही राज आणि उद्धव याच नावाने ओळखले जाते. आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही वीस हजार रुपयांची पदरमोड करुन अयोध्येत पोहचले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com