टायगरचा पिंजऱ्यातील मुक्काम सोमवारपर्यंत?; न्यायाधीशांची बदली

वृत्तसंस्था
शनिवार, 7 एप्रिल 2018

सलमानच्या वकिलांना धमक्‍या 
आज झालेल्या सुनावणीस सलमान खानच्या दोन्ही बहिणी उपस्थित होत्या, सलमानचे वकील महेश बोडा यांनी आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्‍या दिल्या जात असल्याचा दावा केला. धमक्‍यानंतरही आपण सलमानची बाजू न्यायालयात मांडू, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे आज अभिनेत्री प्रीती झिंटानेही सलमानची जोधपूरला जाऊन भेट घेतली. 

जयपूर  : बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणामध्ये शिक्षा सुनाविण्यात आलेल्या सिनेअभिनेता सलमान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची शुक्रवारी रात्री बदली करण्यात आली आहे. त्यामुळे सलमानचा कारागृहातील मुक्काम सोमवारपर्यंत कायम राहणार असल्याची शक्यता आहे.

सलमानला शुक्रवारी जामीन मिळू शकला नव्हता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांनी आपला निर्णय शनिवार (ता.7) पर्यंत राखून ठेवल्याने सलमानला आजची रात्रही तुरुंगामध्येच काढावी लागली. मात्र शुक्रवारी रात्री राजस्थानमधील 84 न्यायाधीशांंच्या बदली करण्यात आली. त्यामध्ये रवींद्रकुमार जोशी यांचीही बदली झाली असून, पुन्हा नव्या न्यायाधीशांसमोर सर्व प्रक्रिया नव्याने सुरु करावी लागणार आहे. त्यामुळे आज शनिवार असल्याने सलमानचा कारागृहातील मुक्काम सोमवारपर्यंत असेल अशी शक्यता आहे. आता त्याला थेट सोमवारीच उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज करता येणार आहे. 

जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी सलमानला 5 वर्षांचा कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. न्यायालयामध्ये सलमानची बाजू मांडणारे वकील हस्तीमल सारस्वत आणि महेश बोडा यांनी कमकुवत पुरावे आणि अशिलाच्या चांगल्या चारित्र्याचा दाखला दिला. या दोन घटकांच्या आधारे सलमानला जामीन मंजूर केला जावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली होती. दुसऱ्या बाजूला सरकारी वकील पोकर राम यांनी सलमानच्या जामिनाला विरोध केला. सलमानला जामीन मंजूर केला तर सर्वसामान्य लोकांवर याचा वाईट परिणाम होईल. सलमानचे कृत्य पाहता त्याला दयामाया दाखविता येणार नाही, यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये, असा दावा त्यांनी केला होता.

सलमानच्या वकिलांना धमक्‍या 
आज झालेल्या सुनावणीस सलमान खानच्या दोन्ही बहिणी उपस्थित होत्या, सलमानचे वकील महेश बोडा यांनी आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्‍या दिल्या जात असल्याचा दावा केला. धमक्‍यानंतरही आपण सलमानची बाजू न्यायालयात मांडू, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे आज अभिनेत्री प्रीती झिंटानेही सलमानची जोधपूरला जाऊन भेट घेतली. 

Web Title: Balckbuck Poaching case Salman Khan stay in jail