पाकिस्तानी नाणी, नकाशा, संदेशासह पंजाबमध्ये आढळले फुगे

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मार्च 2017

पंजाबमधील कपूरथाला येथील मल्लिया गावात चार संशयास्पद फुगे सापडली आहे. फुग्यांसोबत पाकिस्तानमधील नाणी, नकाशा आणि उर्दू किंवा तत्सम भाषेतील संदेशही आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

पंजाब - पंजाबमधील कपूरथाला येथील मल्लिया गावात चार संशयास्पद फुगे सापडली आहे. फुग्यांसोबत पाकिस्तानमधील नाणी, नकाशा आणि उर्दू किंवा तत्सम भाषेतील संदेशही आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

मंगळवारी मल्लिया गावातील शेतकरी जोगिंदर सिंह यांना त्यांच्या शेतात ही फुगे आढळून आली. त्यानंतर सिंह यांनी या बाबत गावकऱ्यांना आणि पोलिसांनी माहिती दिली. याबाबत बोलताना कपूरथाला येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप कुमार शर्मा म्हणाले की, "गावातील शेजमिनीवर चार फुगे एकत्र सापडले आहेत. त्यावर उर्दू किंवा तत्सम भाषेतील संदेश लिहिला आहे. कमी वजनाची दोन नाणीही तेथे सापडली आहेत. ती बहुतेक चांदीची नाणी आहेत. आम्ही संदेश आणि नाणी तपासत आहोत. आम्ही संदेश वाचून घेणार आहोत, ज्यामुळे याबाबत काहीतरी माहिती मिळेल.'

हे फुगे पाकमधून आले असतील का यावर विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना शर्मा म्हणाले, "फुग्यांद्वारे संदेश पाठविणे शक्‍य नाही. कारण फुग्याची दिशा वाऱ्याच्या दिशेनुसार बदलत राहते. त्यासाठी प्रशिक्षित पक्षी वापरला जातो. आम्ही हा संदेश वाचू शकतील अशा व्यक्तीचा शोध घेत आहोत.' या प्रकरणाचा गंभीरपणे तपास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Ballons with Pak currency found in Punjab