हुंड्याबाबतची 'ती' वेबसाइट बंद करा

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

नवी दिल्ली : भारतात सुरु असलेली हुंड्याची प्रथा थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर आता देशात हुंडाविरोधी मोहीम सुरु करण्यात आली. मात्र, दुसरीकडे हुंडा किती घ्यावा, याची माहिती देणारी वेबसाइट लाँच करण्यात आली. या वेबसाइटच्या माध्यमातून हुंडा किती घ्यावा आणि हुंड्यासाठी कॅलक्युलेशनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे अशा वेबसाइटवर बंदी आणावी, अशी मागणी केली जात आहे.

देशातील काही भागात नवऱ्या मुलाला मुलीकडून अजूनही हुंडा दिला जात आहे. तसेच हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेला मारहाण करणे, मानसिक छळ करणे यांसारखे प्रकार सर्रासपणे सुरु आहेत. त्यामुळे यावर सरकारकडून कडक पावले उचलली जात आहेत. देशात हुंडाविरोधी मोहीम सुरु करण्यात आली आहे. असे असताना मात्र, दुसरीकडे हुंडा घेण्यासाठी वेबसाइट लाँच करण्यात आली. www.dowrycalculator.com या वेबसाइटवर नवऱ्या मुलाला किती हुंडा मिळावा, याचे कॅलक्युलेश केले जाते. त्यामुळे महिला आणि बालविकासमंत्री मेनका गांधी यांनी या वेबसाइटवर बंदी आणण्याची मागणी केली. तसेच त्यांनी केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहून ही वेबसाइट बंद करून संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. 

दरम्यान, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या वेबसाइटची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. त्यांनी या तक्रारीत म्हटले, की भारतात अशाप्रकारची वेबसाइट असणे ही एक अत्यंत लज्जास्पद बाब आहे. त्यामुळे ही वेबसाइट लवकर बंद व्हायला हवी आणि यातील संबंधितांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.  

Web Title: ban on dowry related website