नोटाबंदीचा निर्णय जुलमी - अमर्त्य सेन

पीटीआय
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर कडाडून टीकास्त्र सोडले. मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय जुलमी असून तो विश्‍वासाचा मूलाधार असलेल्या अर्थव्यवस्थेला उद्‌ध्वस्त करणारा आहे, अशा शब्दात सेन यांनी टिप्पण्णी केली. 

हार्वर्ड येथील थॉमस डब्ल्यू. लॅमाँट विद्यापीठात प्राध्यापक असणाऱ्या सेन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नोटाबंदीच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेला फटका बसणार असल्याचे सांगितले. विश्‍वासावर आधारित अर्थव्यवस्था टिकवून ठेवायला हवी, असे सांगताना ते म्हणाले, ‘‘नोटाबंदीचा निर्णय हा चलनव्यवस्थेला कमकुवत बनवणारा आहे. त्याचा बॅंक खात्यांवरही विपरीत परिणाम होणार आहे. इतकेच नव्हे भारतीय अर्थव्यवस्था पत व विश्‍वासावर आधारित आहे, ही व्यवस्थाही या निर्णयामुळे कोलमडणार आहे.’’

नोटाबंदीवरील त्यांची मते ही अर्थशास्त्रीय बाजूने मांडली असून ती राजकीय नसल्याचेही सेन यांनी या वेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘मी काही भांडवलशाहीचा पुरस्कर्ता नाही. पण भांडवलशाहीची दुसरी बाजू पाहिल्यास त्यामध्ये अनेकांनी यश संपादन केले आहे. भांडवलशाहीचा कणाही विश्‍वास आहे. या अंगाने मोदींच्या निर्णयाकडे पाहिल्यास तो देशाला एकाधिकारशाहीकडे नेणारा वाटतो,’’ असेही सेन यांनी या वेळी सांगितले.

Web Title: ban notes the decision violent - Amartya Sen