संघाच्या लाठीवर बंदी घाला; सरसंघचालकांना नोटीस

Might be Ban on RSS stick
Might be Ban on RSS stick

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांच्या हातातील लाठीवर बंदी घालण्यात यावी, याबाबतची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली. ही याचिका नागपूरमधील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेवर अतिरिक्त न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना नोटीसही बजावली आहे. 

नागपूरमधील न्यायालयात मोहनिस जबलपुरे यांनी ही याचिका दाखल केली. या याचिकेमध्ये त्यांनी सांगितले, की पथसंचलनात स्वयंसेवकांनी हातात लाठी घेऊन सामील होणे, हे नियमांचे उल्लंघन आहे. भागवत यांनी स्वयंसेवकांना लाठी घेऊन पथसंचलनात सामील होण्याचे आदेश दिले. मात्र, हा प्रकार म्हणजे नियमांचे उल्लंघन करणारा आहे. याचिकाकर्ते जबलपुरे यांनी यासंदर्भात माहिती अधिकारांतर्गत पोलिसांकडून माहिती मागवली होती. 

दरम्यान, या अटीचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे यामध्ये म्हटले आहे. असा दावा याचिकेत करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com