तमिळनाडूत शरिया न्यायालयावर बंदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : तमिळनाडूतील मशिदींमध्ये भरणाऱ्या शरिया न्यायालयांवर आज मद्रास उच्च न्यायालयाने बंदी घालण्याचे आदेश दिले. प्रार्थनास्थळावर केवळ प्रार्थनाच व्हावी, असे न्यायालयाने संबंधित आदेश देताना म्हटले आहे.

अनिवासी भारतीय अब्दुल रहमान यांनी या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायाधीश संजय कौल व एम. सुंदर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. चेन्नईतील अण्णा सलाई मशिदीत अगदी न्यायव्यस्थेनुसार न्यायालय सुरू असल्याचे निदर्शनास आणून देत अशा ठिकाणी फक्त प्रार्थना होणे अपेक्षित असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. राज्य सरकारने अशा शरिया न्यायालयांवर बंदी घालून त्याबाबतच्या सद्यःस्थितीचा अहवाल न्यायालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सरकारला चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

या न्यायालयांत समन्स बजावणे, विवाह, तलाकसंबंधी प्रकरणांवर सुनावणी घेणे, अशी अन्य कामे पार पडतात. या व्यवस्थेकडून येथील मुस्लिम समाजाचे उत्पीडन सुरू असल्याचा आरोप रहमान यांच्या वकिलाने केला आहे. मला स्वतः पत्नीसोबत राहण्याची इच्छा असताना तलाकसंबंधी कागदपत्रांवर माझ्या जबरदस्तीने स्वाक्षऱ्या घेतल्याची माहितीही त्यांनी उघड केली.

Web Title: ban on sharia court in tamilnadu