विद्यार्थीनींचे अंतर्वस्त्रे चोरणारा सीसीटीव्हीत कैद

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

शहरातील महाराणी महिला महाविद्यालयातून एक अजब प्रकार समोर आला आहे. एक अज्ञात व्यक्ती महिलांच्या वसतीगृहात वाळत घातलेले अंतर्वस्त्रे स्वत: परिधान करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

बंगळूर : शहरातील महाराणी महिला महाविद्यालयात घडलेला  एक अजब प्रकार समोर आला आहे. एक अज्ञात व्यक्ती महिलांच्या वसतीगृहात वाळत घातलेले अंतर्वस्त्रे स्वत: परिधान करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

12 फेब्रुवारी रोजी घडलेला हा प्रकार नुकताच समोर आला आहे. अर्धनग्न अवस्थेतील एक अज्ञात व्यक्ती मध्यरात्री मुलींच्या वसतीगृहात कपडे वाळत घातलेल्या ठिकाणी येत असून तो मुलींचे कपडे स्वत: परिधान करत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. त्याच्या हातात चाकू असल्याचेही दिसत आहे. एका सुरक्षा रक्षकाने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता तो व्यक्ती कंपाऊंड वॉलवरून पळून गेला. त्या व्यक्तीने किमान एक डझन अंतर्वस्त्रे चोरी केल्याचा आरोप विद्यार्थीनींनी केला आहे. अशा प्रकारे महाविद्यालयात आणि वसतीगृहात लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची तक्रार महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी अनेकदा महाविद्यालयाच्या प्रशासनासह पोलिसांकडे केली आहे. मात्र त्याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.

महाविद्यालयातील एक व्याख्याता लैंगिक छळ करत असल्याचा आरोप एका विद्यार्थीनीने केला होता. या आरोपाची दखल घेत महिलांविरुद्धच्या लैंगिक हिंसा प्रतिबंधित करणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीने या प्रकरणाचा तपास केला. त्यावेळी समितीला सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची विनंती करत वरील अजब प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यात आले. या प्रकरणासह ही समिती महाविद्यालयातील अकरा व्याख्यात्यांची चौकशी करत आहे.

Web Title: Bangalore women's college caught the thief who wears women's underwear