भाजपमध्ये जोरदार इनकमिंग; बांगलादेशी अभिनेत्रीने केला प्रवेश

वृत्तसंस्था
बुधवार, 5 जून 2019

लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता जोरदार इनकमिंग सुरु असून आज (ता.05) बांगलादेशी अभिनेत्री अजू घोष यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या यशामुळे बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष संघटन वाढविण्याकडे लक्ष देत आहे. पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितित अभिनेत्री अंजू घोष यांनी पक्षप्रवेश केला.

कोलकता: लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता जोरदार इनकमिंग सुरु असून आज (ता.05) बांगलादेशी अभिनेत्री अजू घोष यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या यशामुळे बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष संघटन वाढविण्याकडे लक्ष देत आहे. पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितित अभिनेत्री अंजू घोष यांनी पक्षप्रवेश केला.

भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर अंजू घोष यांच्या वर्तमान नागरिकत्वाबद्दल माध्यमांनी विचारले असता अंजू घोष यांनी उत्तर देण्याचे टाळले. दरम्यान, याआधीही भाजपमध्ये विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसच्या आमदारांसोबत काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजप पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला जोरदार टक्कर देत असून तृणमूल काँग्रेसच्या अनेक छोट्या-मोठ्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आज अंजू घोष यांनी केलेला पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangladeshi actress Anju Ghosh joins BJP