बंगळूरमधली विनयभंगप्रकरणी चार जणांना अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

बंगळूर: नववर्षाच्या स्वागताच्या दिवशी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. या प्रकारचे कृत्य करणाऱ्यांची ओळख पटली असून, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी आज सांगितले.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की या घटनेला जबाबदार असलेल्या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत चौकशीसाठी काल 12 जणांना ताब्यात घेतले होते.

काम्मानाहाल्ली परिसरातील इमारतीवर लावलेल्या सीसी टीव्ही फुटेजचे रेकॉर्डिंगमध्ये पीडित महिला 31 डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजून 40 मिनिटांनी रिक्षातून उतरून आपल्या घराकडे निघाली होती. त्या वेळी तेथे दोन स्कूटरवर थांबलेल्या युवकांनी तिचा विनयभंग केला. ज्या वेळी महिलेने आरडाओरडा सुरू केला, त्या वेळी युवकांनी तिला जमिनीवर ढकलले आणि ते पळून गेले. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. शहरात महिलांचे संरक्षण करण्यात पोलिसांना अपयश येत असल्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने टीका केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banglore: Four arrested for molestation