मुंबई-पुण्याचं ट्रॅफिक पोहोचलं दुनियाभरात; बंगळूर 'नंबर 1'

वृत्तसंस्था
Thursday, 30 January 2020

नवी दिल्ली : ऑफिसला जाताना उशीर होतो म्हणून ज्या ट्रॅफिकला दूषणं दिली जातात, आपल्या शहरातलं तेच ट्र्रॅफिक आता दुनियाभरात पोहोचलं आहे. विशेष म्हणजे अखंड दुनियेतल्या ट्रॅफिकच्या प्रमाणाचं मोजमाप केल्यानंतर या 'टॉप 10' नावांमध्ये भारतातल्या चार शहरांची नावं आहेत. टॉमटॉम या अर्बन मोबिलीटी लोकेशन टेक्नॉलॉजी एक्सपर्ट असलेल्या कंपनीने आपल्या सर्वेक्षणात भारतातील चार शहरे ही दुनियेतल्या सर्वाधिक ट्र्रॅफिक असलेल्या शहरात गणली गेली आहेत. त्यात पुणे पाचव्या स्थानावर आहे.

नवी दिल्ली : ऑफिसला जाताना उशीर होतो म्हणून ज्या ट्रॅफिकला दूषणं दिली जातात, आपल्या शहरातलं तेच ट्र्रॅफिक आता दुनियाभरात पोहोचलं आहे. विशेष म्हणजे अखंड दुनियेतल्या ट्रॅफिकच्या प्रमाणाचं मोजमाप केल्यानंतर या 'टॉप 10' नावांमध्ये भारतातल्या चार शहरांची नावं आहेत. टॉमटॉम या अर्बन मोबिलीटी लोकेशन टेक्नॉलॉजी एक्सपर्ट असलेल्या कंपनीने आपल्या सर्वेक्षणात भारतातील चार शहरे ही दुनियेतल्या सर्वाधिक ट्र्रॅफिक असलेल्या शहरात गणली गेली आहेत. त्यात पुणे पाचव्या स्थानावर आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for traffic in bangalore

टॉमटॉम (TOM2) या लोकेशन तंत्रज्ञान तज्ज्ञ कंपनीने आज टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स (TomTom Traffic Index) हा अहवाल प्रसिद्ध केला. 57 देशांतील 416 शहरांमधील वाहतुकीचा लेखाजोखा यात मांडण्यात आला आहे. 59 टक्के कोंडी असणाऱ्या (वाहतूक कोंडीत अडकल्याचा अतिरिक्त वेळ) पुण्याने या यादीत पाचवा क्रमांक पटकावला आहे. पुणेकर साधारणपणे पीक अवर्समध्ये प्रवासात 193 तास म्हणजे दरवर्षी आठ दिवस आणि एक तास अधिकचा घालवतात. 2 ऑगस्ट 2019 मध्ये शहरात सर्वाधिक कोंडी (93 टक्के) होती तर 27 ऑक्टोबर 2019 रोजी (30 टक्के) सर्वात कमी वाहतूक कोंडी होती. 

या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेले मुंबई हे महाराष्ट्रातील आणखी एक शहर सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या पाच शहरांमध्ये समाविष्ट झाले आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी 65 टक्के आहे. सरासरी, मुंबईकर पीक अवर्समध्ये 209 तास म्हणजे वर्षाला 8 दिवस, 17 तास इतका अतिरिक्त वेळ वाहतूक कोंडीत घालवतात. मुंबईतील सर्वाधिक कोंडी (101 टक्के) 9 सप्टेंबर 2019 मध्ये तर सर्वात कमी वाहतूक कोंडी (19 टक्के) 21 मार्च 2019 मध्ये होती. 

Image result for traffic in delhi

स्वच्छता, जलसाक्षरता आणि गांधीविचार

सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या पहिल्या 10 शहरांमध्ये भारतातील चार शहरे असल्याने टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2019 मध्ये भारत आघाडीवर आहे. या यादीत 71 टक्के वाहतूक कोंडीसह बंगळुरु पहिल्या क्रमांकावर आहे. तर, मुंबई (65 टक्के), पुणे (59 टक्के) आणि नवी दिल्ली (56 टक्के) ही शहरे अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. पहिल्या दहा शहरांमध्ये फिलिपाईन्समधील  मनिला,  कोलंबियामधील बोगोटा, रशियातील मॉस्को, पेरुतील लिमा, तुर्कस्थानातील इस्तंबुल आणि इंडोनेशियातील जकार्ता या शहरांचा समावेश आहे.

भारतीय शहरांमधील वाहतूक कोंडीची पातळी

बंगळुरु : सरासरी पातळीवर, बंगळुरुवासी पीक अवर्समध्ये 243 तास म्हणजेच वर्षभरात 10 दिवस, 3 तास वाहतूक कोंडीत घालवतात. शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी (103 टक्के) 20 ऑगस्ट, 2019 मध्ये तर सर्वात कमी (30 टक्के) 6 एप्रिल, 2019 मध्ये होती. 

नवी दिल्ली : सरासरी पातळीवर, दिल्लीकर पीक अवर्समध्ये 190 तास म्हणजेच वर्षभरात 7 दिवस, 22 तास वाहतूक कोंडीत घालवतात. शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी (81 टक्के) 32 ऑक्टोबर 2019 मध्ये तर सर्वात कमी (6 टक्के) 21 मार्च 2019 मध्ये होती.

Image result for traffic in pune

जगभरात सर्वत्रच कोंडी वाढतेय :  
मागील दशकभरात जगभरात सगळीकडेच वाहतुकीची कोंडी वाढली आहे. टॉमटॉमने आपल्या नव्या ट्रॅफिक इंडेक्स अहवालात समाविष्ट केलेलेल्या 239 शहरांमध्ये (57 टक्के) 2018 ते 2019 या काळात वाहतूक कोंडी वाढली आहे. फक्त 63 शहरांमध्ये वाहतूक कोंडी कमी झाल्याचे निदर्शनास आले. वाहतूक कोंडींमध्ये जगभरात होणारी वाढ ही आर्थिक बळकटीचे निदर्शक असली तरी त्यामुळे अब्जोवधींचे नुकसानही होत आहे.
टॉमटॉम इंडियाचे महाव्यवस्थापक वर्नर वॅन ह्युस्टीन म्हणाले, "वाहतूक कोंडींचे हे प्रमाण कमी केले नाही तर पुढचा प्रवास संपूर्ण जगासाठी कठीण असणार आहे. अशावेळी कार शेअरिंगसारख्या सेवांमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. मात्र, योजनाकर्त्यांनी, नियोजकांनी वाहतूक कोंडीची पातळी आणि त्याचे परिणाम अभ्यासण्यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध सर्व साधनांचा वापर करायला हवा. त्यामुळे त्यांना पायाभूत सुविधांच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेता येतील."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banglore Mumbai Pune Delhi have most traffic in the world says tomtom survey