जिवावर बेतले ते हातावर निभावले

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

बंगळूरमधील व्यावसायिकावर मगरीचा हल्ला

बंगळूर: बंगळूरमधील मुदित दंडवते (वय 26) हा तरुण व्यावसायिक मगरीच्या हल्ल्यातून बचावला असला तरी डाव्या हाताचा मगरीने चावे घेतल्याने मनगटाच्या वरचा कोपऱ्यापर्यंतचा भाग त्याला गमवावा लागला आहे. दरम्यान, जंगलातील प्रतिबंधित भागात परवानगीविना प्रवेश केल्याने रमणग्राम पोलिसांनी त्याच्यावर फिर्याद दाखल केली आहे.

मुदितने "आयआयटी'तून शिक्षण घेतले आहे. "स्टार्ट-अप' योजनेअंतर्गत त्याने बंगळूरमध्ये व्यवसाय सुरू केला आहे. रमणग्राम जिल्ह्यातील मंदिरात दर्शनासाठी तो रविवारी (ता. 25) मोटारीने गेला होता. परिसरात मित्र व पाळलेल्या कुत्र्यांसमवेत पायी फिरत असताना कुत्र्यांनी तेथील जलाशयातील पाण्यात उड्या मारल्या. त्यांच्या पाठोपाठ मुदितही पाण्यात उतरला. त्याच वेळी मगरीने त्याच्यावर हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या मुदितला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मगरीच्या हल्ल्यातून मुदिक बचावला असला तरी त्याच्या डाव्या हाताचा मनगटाच्या वरचा भाग मगरीने खाल्ला असल्याने तो पुन्हा जुळविणे शक्‍य नसल्याचे होस्मत रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. अजित बेनेडिक्‍ट रायन यांनी सांगितले. रुग्णाची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ""कुत्र्यांना पाण्याबाहेर काढण्याच्या घाईत आपण तेथील "पाण्यात मगरी आहेत,' अशी सूचना देणारा फलक पाहिला नाही,'' असे मुदितने त्याच्या मित्रांना सांगितले. रमणग्रामचे पोलिस अधीक्षक बी. रमेश यांच्या माहितीनुसार मुदितविरोधात कोणतीही तक्रार आलेली नाही; मात्र जंगलातील निर्बंध असलेल्या क्षेत्रात बेकायदा प्रवेश केल्याने पोलिसांनीच त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: banglore news crocodile attack on mudit dandawate