तीन पाकिस्तानी नागरिकांना बंगळूर येथे अटक

पीटीआय
शुक्रवार, 26 मे 2017

बनावट नावे आणि आधार कार्डसारख्या खोट्या कागदपत्रांसह तीन पाकिस्तानी नागरिक शहरातील कुमारस्वामी भागात राहात होते.

बंगळूर : बनावट ओळखपत्रांच्या आधारे भारतात प्रवेश करून वास्तव्य केल्याच्या आरोपावरून दोन महिलांसह तीन पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज दिली.

या तिघांना मदत केल्याप्रकरणी मूळचा केरळचा असलेल्या एका भारतीय नागरिकालाही काल (बुधवारी) रात्री त्यांच्याबरोबर अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बनावट नावे आणि आधार कार्डसारख्या खोट्या कागदपत्रांसह तीन पाकिस्तानी नागरिक शहरातील कुमारस्वामी भागात राहात होते.

Web Title: banglore news pakistani citizens caught