मला 'बळीचा बकरा' केलेले नाही : मीराकुमार

वृत्तसंस्था
रविवार, 2 जुलै 2017

बंगळूर: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये मला बळीचा बकरा करण्यात आलेला नाही, केवळ विचारसरणीसाठी आपण ही निवडणूक लढवित आहोत असे प्रतिपादन विरोधकांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीराकुमार यांनी आज केले.

विचारसरणीसाठी लढणारे आणि मतैक्‍याचे आवाहन करणारे कधीच बळीचा बकरा होत नाहीत. माझा बाणा लढाऊ असून मी ही लढाई लढेन असेही त्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी केंद्रीयमंत्री आणि "आरपीआय' नेते रामदास आठवले यांनी मीराकुमार यांच्यावर टीका करताना त्यांचा बळीचा बकरा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.

याबाबत पत्रकारांनी छेडले असते मीराकुमार यांनी उपरोक्त मत मांडले. मीराकुमार यांनी आज कर्नाटकमध्ये जावून कॉंग्रेसच्या आमदार खासदारांची भेट घेतली. कर्नाटक प्रदेश समितीच्या झालेल्या या बैठकीस अनेक बडे नेते उपस्थित होते. मीराकुमार म्हणाल्या की, "" मी जेथे जाते तेथे लोक माझ्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे सांगतात. मला पाठिंबा नसेल तर ही निवडणूक का घेतली जात आहे, अशा मंडळींनी परस्पर निकाल जाहीर करून टाकावा.'' मीराकुमार यांनी आज धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांची भेट घेत त्यांच्याकडून पाठिंब्याची मागणी केली.

मानसिकता बदलायला हवी
राष्ट्रपतीपदासाठी होणारी निवडणूक ही देशाच्या सर्वोच्च पदासाठीची आहे. यास "दलित निवडणूक' असे स्वरूप मिळणे चुकीचे आहे. सर्वप्रथम आपल्याला मानसिकता बदलायला हवी, आज 2017 मध्येही उच्च गुणवत्ताधारक मंडळी जातीची चर्चा करताना आढळतात. याआधी जेव्हा दोन्ही उच्चभ्रू उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात उतरले होते तेव्हा जातीची चर्चा का झाली नाही, असा सवालही त्यांनी केला. मीराकुमार या बिहारच्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीही भेट घेणार आहेत.

Web Title: banglore news president election and meira kumar