शशिकलांची आमदाराच्या निवासस्थानाला भेट: डी. रूपा

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

बंगळूर : कर्नाटकच्या पोलिस उपमहानिरीक्षक डी. रूपा यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकास (एसीबी) सादर केलेल्या आणखी एका अहवालामुळे खळबळ निर्माण झाली आहे. सध्या तुरुंगवास भोगत असलेल्या "अण्णा द्रमुक'च्या नेत्या व्ही. के. शशिकला यांनी होसूरमधील आमदाराच्या निवासस्थानास भेट दिल्याचे रूपा यांनी आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे. शशिकला यांना सध्या कर्नाटकमधील परप्पना अग्रहारा तुरुंगामध्ये ठेवण्यात आले आहे.

या तुरुंगाचे प्रवेशद्वार आणि गेट क्रमांक 1 आणि 2 वर लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधून शशिकला या तुरुंगातून बाहेर पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असे रूपा यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. शशिकला यांना तुरुंगामध्ये दिल्या जाणाऱ्या विशेष वागणुकीबाबत रूपा यांनी व्हिडिओदेखील सादर केला आहे. या व्हिडिओंमध्ये त्या स्पष्टपणे तुरुंगातून बाहेर पडत असल्याचे दिसून येते. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर शशिकला आणि त्यांचे अन्य दोन नातेवाईक व्ही. एन. सुधाकरन आणि इलावरसी यांची तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आली होती. ज्या बराकीमध्ये महिला कैद्यांना ठेवण्यात येते त्याभोवती सुरक्षा रक्षकच तैनात करण्यात आलेले नाही, असेही चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

प्रथमश्रेणी कैद्यांसारखी वागणूक
दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आरोपांनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. शशिकला यांना तुरुंगामध्येच प्रथमश्रेणी कैद्यांसारखी वागणूक दिली जात आहे. शशिकला यांच्याप्रमाणेच मुद्रांकशुल्क गैरव्यवहाराचा सूत्रधार तेलगीसही खास सुविधा दिल्या जात असल्याचे रूपा यांनी आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

Web Title: banglore news shashikala mla home and d roopa