विवाह कार्यासाठी अडीच लाख 8 नोव्हेंबरपर्यंतच्या शिलकीतूनच

पीटीआय
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - विवाह कार्यासाठी बॅंक खात्यातून अडीच लाख रुपये 8 नोव्हेंबरपर्यंतच्या खात्यातील शिलकीतूनच काढता येणार असून, यासाठी विवाहपत्रिका, मंगल कार्यालय आणि केटररला दिलेल्या पैशांची बिले सादर करावी लागणार आहेत.

विवाह कार्यासाठी अडीच लाख रुपये बॅंक खात्यातून काढण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने मार्गदर्शक सूचना सोमवारी जाहीर केल्या. यात म्हटले आहे, की बॅंक खात्यावर 8 नोव्हेंबरपर्यंत असलेल्या शिलकीतूनच विवाह कार्यासाठी अडीच लाख काढता येणार आहेत. यासाठी विवाहाची तारीख 30 डिसेंबरच्या आधीची असणे आवश्‍यक आहे. तसेच, विवाहपत्रिका, मंगल कार्यालय आणि केटररला दिलेल्या पैशांची बिले बॅंकेत सादर करावी लागणार आहेत. बॅंकांना विवाह कार्यासाठी दिलेल्या पैशांची, तसेच ते काढणाऱ्यांची संपूर्ण माहिती नोंद ठेवावी लागणार आहे.

तसेच विवाह कार्याचा खर्च धनादेश अथवा ड्राफ्ट, डेबिट अथवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंग, एनईएफटी अथवा आरटीजीएसद्वारे करण्यासाठी बॅंकांनी प्रोत्साहन द्यावे, असेही रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. बॅंकांमध्ये पैशांचा तुटवडा असल्याने रिझर्व्ह बॅंकेने कठोर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

Web Title: bank gives 2.5 lakh for marriage programe