बायकोचा खून करण्यासाठी हवीय सुट्टी...

Bank manager writes to PM, Prez, seeks leave to murder wife and perform her last rites
Bank manager writes to PM, Prez, seeks leave to murder wife and perform her last rites

पटणाः बायकोचा खून केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी रजा हवी आहे, असे कारण लिहून ते पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद व मानवाधिकार आयोगाकडे पाठविले आहे. संबंधित पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

दक्षिण बिहार ग्रामीण बॅंकेतील (बक्षता ब्रँच) मुन्ना प्रसाद यांनी पतंप्रधान, राष्ट्रपती व मानवधिकार आयोगाला रजेसाठी पत्र लिहीले आहे. रजेचे कारण दिले आहे की, 'बायकोचा खून करून तिच्यावर अंत्यंसस्कार करायचेत, त्यासाठी सुट्टी द्या, असे मुन्ना प्रसाद यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.'

मुन्ना प्रसाद यांना पत्नी आजारी असल्याने तिच्यावर आठवड्यातून दोन वेळा डायलिसीस करावी लागते. बॅंकेत ते एकटेच असल्यामुळे रजा मिळत नव्हती. पत्नीवर उपचार करण्यासाठी सुट्टी मिळत नसल्यामुळे त्यांनी अशा प्रकारे अर्ज करण्याचा मार्ग निवडला. बायकोचा खून करुन तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी फक्त दोन दिवसांची सुट्टी द्या, असे अर्जामध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे या रजा अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. सुटीवर जाऊन आल्यानंतर ते बॅंकेत रुजू झाले. पण, रजेचे कारणामुळे ते चर्चेत आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com