नोटा बदलून दिल्याने बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

कोलकाता - उलुबेरिया आणि फुलेश्‍वर दरम्यानच्या रेल्वेमार्गावर रजत चौधरी नावाच्या राष्ट्रीयकृत बँकच्या कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. नोटा बदलून देण्यासाठी सहकाऱ्यांनी दबाव टाकला आणि नंतर आपल्याविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली, असा आरोप चौधरी यांनी मृत्यूपूर्वी फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.

चौधरी यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्या केल्याची शक्‍यता रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. चौधरी यांच्या मृत्यूनंतर बँकेच्या बाहेर एक मोटारसायकल आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. चौधरी यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्या फेसबुक वॉलवर एक पोस्ट लिहिली आहे. आपले बँकेतील सहकारी सोमनाथ घोष आणि अमित नायक यांनी लाखो रुपयांच्या नोटा बदलून द्याव्यात यासाठी आपल्यावर दबाव टाकून आपली स्वाक्षरी घेतली असल्याचा आरोप चौधरी यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला आहे. या प्रकाराबद्दल घोष यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आली होती. मात्र, या प्रकरणी घोष यांनी चौधरी यांच्यावर आरोप ठेवत उलुबेरिया पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. 'त्यांनी नोटा बदलल्या आणि माझ्याविरूद्ध पोलिसांकडे तक्रार केली. मी निघून जात आहे. मला आणि माझ्या मित्रांना विसरून जा. माझ्या कुटुंबियांची काळजी घ्या', असे चौधरी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

Web Title: Banker found dead in Kolkata, his FB post: They exchanged notes and then blamed me