'सप'च्या कार्यकर्त्यांनी मोदींविरोधात तळली भजी

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

बरेलीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरचित्रवाणीवरून प्रसारीत झालेल्या मुलाखतीच्या विरोधात समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रामपूर येथे मोदींविरोधात भजी तळली.

समाजवादी पक्षाचे नेते अझम खान म्हणाले की, शंभरहून अधिक युवक एकत्र आले होते. ते सर्वजण उच्चशिक्षीत होते. मोदींविरोधात त्यांनी भजी तळली. त्यांना खऱया रोजगाराची आवश्यकता आहे, हे त्यांना दाखवून द्यायचे आहे.

अझम खांनी यांनी विविध स्टॉलला भेट देत भजी खरेदी करताना खान म्हणाले, 'मोदी व मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे की त्यांनी नोकरी नसलेल्या युवकांसाठी काम करावे. अनेक उच्चशिक्षित युवक आजही बेरोजगार आहेत.'

दरम्यान, समाजवादी पक्षाच्या वतीने बरेली शहरामधील विविध भागांमध्ये भजी तळण्याचे स्टॉल उभारण्यात आले होते.

Web Title: bareilly uttar pradesh news samajwadi party pakoda azam khan