राहुलच्या सांगण्यावर UPSCचा नाद सोडला, आमदार झाली; मंत्रीपदाचीही शक्यता

वृत्तसेवा
Wednesday, 25 December 2019

  • झारखंडची एकमेव अविवाहित महिला आमदार
  • वयाच्या केवळ २८ व्या वर्षी झाली आमदार

रांची : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत हजारीबामधील बडकागाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर अंबा प्रसाद यांचा विजय झाला आहे. अंबा प्रसाद यांचे वय केवळ 28 वर्ष आहे. बडकागांव विधानसभा मतदारसंघातून याआधी अंबा प्रसाद यांचे वडील योगेंद्र साहूंनी 2009 मध्ये तर आई निर्मला देवी यांनी 2014 मध्ये विजय मिळवला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कफन सत्याग्रह आंदोलनामुळे आई-वडिलांना तुरुंगात जावं लागलं आणि अंबा प्रसादने लोकसेवा आयोगाचा(UPSC)अभ्यास अर्धवट सोडला. घरी परतल्यानंतर अंबा प्रसादने हजारीबाग न्यायालयात वकिली सुरू केली. आई-वडील आणि भावावर असलेला खटल्यातही स्वत: लक्ष घातलं. अंबा प्रसादचे वडील योगेंद्र साहू, आई निर्मला देवी आणि भावावर सध्या कफन सत्याग्रह प्रकरणी खटला सुरू आहे. तिचे वडील तुरुंगात तर आई राज्याबाहेर आहे. भावाला तुरुंगातून सोडवण्यात मात्र तिला यश आलं.

CAAवर मकरंद अनासपुरेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

काँग्रेस नेते राहुल गांधींना भेटल्यानंतर राजकारणात सक्रीय
अंबा प्रसाद म्हणाली की, वडिलांच्या सुटकेबाबत मी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांना भेटल्यावर UPSC परिक्षांचा नाद सोडून पूर्णवेळ राजकारणासाठी देण्याचे मी ठरवले होते. यावेळी कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद यांनाही भेटले. अहमद पटेल यांनी या कामात माझी खूप मदत केली. राहुल गांधींनी माझ्या वडिलांबद्दलची माहिती जाणून घेतल्यानंतर मला मदत केली. तसेच यापुढे काम करत राहण्यास सांगितलं. मला काँग्रेस आणि नेत्यांचा पाठिंबा मिळाला. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची चर्चा होती पण विधानसभेसाठी मला संधी दिली आणि त्या संधीचा मी फायदा घेतला. 

Image result for amba prasad"

धाकड गर्ल गीता फोगाटच्या घरी आलाय छोटा सांता

दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेली अंबा प्रसाद ही एकमेव अशी उमेदवार आहे जी अविवाहित आहे. तसेच सर्वात कमी वयाची आमदारही ठरली आहे. अंबा प्रसाद हिने रोशनलाल चौधरी यांना 30 हजार 140 मतांनी पराभूत केलं. अंबा प्रसाद निवडणूक जिंकल्यानंतर म्हटलं की, मी कधी विचारही केला नव्हता की आमदार होईन. पण आई-वडील तुरुंगात गेल्यानंतर शपथ घेतली होती की बडकागाव विधानसभा मतदारसंघात त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करेन.

काँग्रेससोबत गेल्याने मानसिकता बदलली का? - हरिभाऊ बागडे

मंत्रीपद मिळण्याची शक्यता
झारखंडमध्ये आता काँग्रेसच्या हातात सत्ता आहे. जर यामध्ये मंत्रीपदाची संधी मिळाली तर काम करायला आवडेल असंही अंबा प्रसादने म्हटलं आहे. गेल्या चार वर्षांपासून मी या भागात काम करत आहे असंही अंबा प्रसादने म्हटलं. हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये शिक्षण मंत्री अंबा प्रसादला दिलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Barkagaon Election Result 2019: Congress's Amba Prasad wins