कर्नाटकात बसव'राज'; बोम्मईंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

कर्नाटकात बसव'राज'; बोम्मईंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

बसवराज बोम्मई यांनी बुधवारी कर्नाटकचे 26 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी बोम्मई यांनी गोपनीयतेची शपथ दिली. पुढील दोन दिवसात बसवराज यांचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी बसवराज बोम्मई यांनी अंजनेय मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. शपथ घेण्यापूर्वी बसवराज बोम्मई म्हणाले की, आज कॅबिनेट बैठक घेणार आहे. त्यानंतर वरिष्ठ आधिकाऱ्यांसोबतही बैठक होईल, ज्यामध्ये राज्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेतला जाईल.

मंगळवारी भाजपने कर्नाटकचे गटनेते म्हणून बसवराज बोम्मई यांची निवड केली होती. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर बसवराज बोम्मई यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बोम्मई यांनी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये गृह, कायदा, संसदीय आणि कामकाज मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे. उत्तर कर्नाटकातील असलेले लिंगायत नेते बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस आर बोम्मई यांचे सुपुत्र आहेत.

कर्नाटकात बसव'राज'; बोम्मईंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
महापुरामुळे 4000 कोटीं रुपयांचं नुकसान, 209 जणांनी गमावला जीव

कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा जन्म 28 जानेवारी 1960 रोजी झाला. त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव दांडगा आहे. त्यांनी मॅकेनिकल इंजेनिअरिंगमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. जनता दलमधून बसवराज यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवा केली होती.

कर्नाटकात बसव'राज'; बोम्मईंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
'मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणे पांढऱ्या पायाचे'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com