पुण्यातील आयपीएल सामने हलवण्याची चिन्हे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

महेंद्रसिंग धोनीचा संघ पुण्यात खेळणार म्हटल्यावर त्याचे चाहते खुश आहेत. पण आता हा आनंद जास्त काळ टिकण्याची शक्यता नाही. 

मुंबई - चेन्नईत कावेरी पाणीवाटपाला होत असलेल्या विरोधामुळे चेन्नई सुपरकिंग्जला पुण्याचे गहुंजे स्टेडिअम होम ग्राऊंड म्हणून देण्यात आले. परंतू आता परत चेन्नईला आपले बस्तान हलवावे लागण्याची शक्यता आहे. सध्या चेन्नई सुपरकिंग्जचे सामने पुण्यात रंगले आहेत. येथील प्रेक्षकांचा प्रतिसाद या सामन्यांना भरभरुन मिळत आहे. महेंद्रसिंग धोनीचा संघ पुण्यात खेळणार म्हटल्यावर त्याचे चाहते खुश आहेत. पण आता हा आनंद जास्त काळ टिकण्याची शक्यता नाही. 

23 आणि 25 मे ला होणारे प्लेऑफ सामने इतर ठिकाणी हलविण्याची तयारी सुरु आहे. लखनौ येथे हे सामने खेळवले जाऊ शकतात. याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मैदानाची चाचपणी करुन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआय कडून कळते. पुण्याच्या मैदानात पुढचा सामना 28 एप्रिल रोजी होणार आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: BCCI may shift pune IPL playoff matches to Lucknow