बी. कॉमच्या विद्यार्थ्याने उत्तर पत्रिकेत लिहिल्या 'शिव्या'

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

अहमदाबाद- गुजरात विद्यापीठाच्या परिक्षेदरम्यान बी. कॉमची परिक्षा देणाऱया एका विद्यार्थ्याने उत्तर पत्रिकेत चक्क शिव्या लिहिल्याचा प्रकार घडला आहे.

विद्यापीठाची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी मोठी मेहनत घेऊन अभ्यास करताना दिसतात. परंतु, एका विद्यार्थ्याने संपूर्ण उत्तर पत्रिकेत शिव्याच लिहिल्या आहेत. शिवाय, परिक्षेत उत्तीर्ण करावे, अन्यथा गंभीर परिणाम होतील अशी धमकी विद्यार्थ्याने प्राध्यापकांना दिली. बी. कॉमच्या पहिल्या सत्राची परिक्षा नुकतीच पार पडली आहे. यावेळी हा प्रकार घडला आहे.

दरम्यान, उत्तर पत्रिका तपासणाऱया प्राध्यापकाने संबंधित प्रकार विद्यापीठाला कळविला आहे. या विद्यार्थ्यावर कारवाई केली जाणार आहे, असे विद्यापीठाने म्हटले आहे. गुजरात विद्यापीठामध्ये तीन वर्षांपुर्वीही असाच एक प्रकार घडला होता.

Web Title: B.Com student writes abuses in answersheet