लैंगिक अत्याचाऱ्यांना फासावर लटकवा: चंद्राबाबू नायडू

वृत्तसंस्था
रविवार, 6 मे 2018

गुंटूर (आंध्र प्रदेश): महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांनी व अन्य गुन्हे करणाऱ्यांनी पृथ्वीवरील आपला शेवटचा दिवस असल्याचे लक्षात घ्यावे, असा इशारा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी दिला.

गुंटूर (आंध्र प्रदेश): महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांनी व अन्य गुन्हे करणाऱ्यांनी पृथ्वीवरील आपला शेवटचा दिवस असल्याचे लक्षात घ्यावे, असा इशारा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी दिला.

अशा प्रकारच्या गुन्ह्यांना येथे थारा नाही. जो कोणी असे गुन्हे करेल, तो दिवस त्याच्या आयुष्याचा अखेरचा दिवस असेल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या नऊ वर्षांच्या मुलीची भेट नायडू आज सरकारी दवाखान्यात घेतली. "असे गुन्हे करणाऱ्यांवर "निर्भया' व "पॉक्‍सो' कायद्याखाली गुन्हा नोंदविला जाईल. त्यांच्याबद्दल कडक धोरण राबविले जाईल. त्यांना फासावर लटकवण्यात येईल, ' असे सांगत यातून इतरांना कडक इशारा मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

बारा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद नवीन कायद्यात केल्याने त्याचे स्वागत नायडू यांनी केले. हे गुन्हे कडक पद्धतीने हाताळले पाहिजेत. असे गुन्हेगार रस्त्यात दिसल्यास महिलांनी त्यांच्या तोंडावर थुंकावे. लोकांमध्ये या गुन्ह्याविरोधात आवाज उठवायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गुंटूर जिल्ह्यातील दाचेपल्ली गावातील एका रिक्षाचालकाने बुधवारी (ता. 3) रात्री मुलीवर लैंगिक अत्याचार केला. सरकारी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

मुलीचे पालकत्व स्वीकारले
पीडितेच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी (ता. 4) पाच लाखांची भरपाई दिली. याशिवाय संबंधित मुलीच्या पुढील आयुष्यासाठी तिच्या नावे पाच लाख रुपयांची ठेव ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री नायडू यांनी आज केली. तसेच तिच्या कुटुंबाला दोन एकर शेत जमीन, घर व तिच्या वडिलांना नोकरी देण्यात येणार आहे. तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च मुख्यमंत्री स्वतः करणार आहे. "मी तिचे पालकत्व स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात राजकारण आणल्याबद्दल चंद्राबाबू यांनी विरोधी पक्ष वायआरएस कॉंग्रेसवर टीका केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to be hanged for sexual assault say Chandrababu Naidu