माहिती घेऊनच बोला; मोदींकडून नवनिर्वाचित खासदारांना सूचना

शनिवार, 25 मे 2019

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिला खासदारांचे रेकॉर्ड तोडण्यात आले. पूर्वीपेक्षा आता महिला खासदारांची संख्या वाढली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच माहिती घेऊनच बोला, असा सल्लाही त्यांनी नवनिर्वाचित खासदारांना दिला.

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिला खासदारांचे रेकॉर्ड तोडण्यात आले. पूर्वीपेक्षा आता महिला खासदारांची संख्या वाढली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच माहिती घेऊनच बोला, असा सल्लाही त्यांनी नवनिर्वाचित खासदारांना दिला.

संसद भवन येथे नरेंद्र मोदी बोलत होते. ते म्हणाले, आता आम्ही नवीन ऊर्जा घेऊन कामाला लागणार आहोत. एनडीएकडे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक एनर्जी आणि दुसरी सिनर्जी. अटलीजी, अडवानी यांनी सुरु केलेली यात्रा आजही सुरुच आहे. . अटलजींचे संस्कार आम्हाला दिशा देत आहेत. एकत्रित काम करणे हे एनडीएचे वैशिष्ट्य आहे. जनता आणि सरकारमध्ये विश्वासाचे नातं आहे. 

माथा टेकून घेतले संविधानाचे दर्शन

नरेंद्र मोदी यांनी संसदेत पाऊल ठेवल्यानंतर माथा टेकून संविधानाचे दर्शन घेतले. 

अहंकारापासूून दूर राहा

मोदींनी नवनिर्वाचित खासदांना सांगितले, की मुद्द्याची योग्य माहिती घ्या आणि मगच बोला. वादापासून अहंकारापासून दूर राहा. छापून येणं, बोलणं यांपासून थोडं दूर राहा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be well informed before speaking says Narendra Modi