बदकांमुळे वाढतो पाण्यातील ऑक्सिजन : मुख्यमंत्री देव

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

''जेव्हा बदक पाण्यात पोहतात तेव्हा पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण आपोआप वाढते. त्यामुळे ऑक्सिजनचे रिसायकलिंग होते.''  

- विप्लव देव, मुख्यमंत्री, त्रिपुरा

आगरतळा : पाण्यात बदक पोहल्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, असा अजब तर्क त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी काढला आहे. तसेच पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यासाठी संपूर्ण राज्यात बदकांचे वाटप करण्याचा विचारही देव यांच्याकडून केला जात आहे.

नीरमहल येथे नौकानयन स्पर्धेचे उद्घाटन देव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी देव बोलत होते. ते म्हणाले, बदक पाण्यात पोहल्यामुळे पाण्याचे रिसायकलिंग होते आणि त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते. पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण वाढत असल्यामुळे देव सरकारकडून मासेमारी करणाऱ्या लोकांना 50 हजार बदकांचे वाटप करण्यात येणार आहे. 

याबाबत देव म्हणाले, ''जेव्हा बदक पाण्यात पोहतात तेव्हा पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण आपोआप वाढते. त्यामुळे ऑक्सिजनचे रिसायकलिंग होते''  

दरम्यान, देव यांनी देशात होणाऱ्या मॉब लिचिंगसारख्या प्रकारावरही भाष्य केले होते. मॉब लिंचिंग हे परदेशी षड्यंत्र आहे, असे देव म्हणाले होते.

Web Title: Because of Duck oxygen level is increases says CM Dev