अतिमद्यपानामुळे घटते आयुष्य

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 एप्रिल 2018

अतिमद्यपानामुळे आयुष्यातील एक ते दोन वर्षे कमी होत असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे. आठवड्यातून दहा ते 15 वेळा मद्यपान करणाऱ्यांना हा धोका जास्त असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.

लंडन : अतिमद्यपानामुळे आयुष्यातील एक ते दोन वर्षे कमी होत असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे. आठवड्यातून दहा ते 15 वेळा मद्यपान करणाऱ्यांना हा धोका जास्त असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. एवढेच नव्हे, तर आठवड्यात 18 पेक्षा जास्त मद्यपान करणाऱ्यांचे आयुष्य चार ते पाच वर्षांनी घटत असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

आठवड्यातून दहा वेळा मद्यपान करणाऱ्यांचे आयुष्य सहा महिन्यांनी कमी होते, असे अभ्यासात आढळल्याचे "लॅन्सेट स्टडी'ने नमूद केले आहे. अतिमद्यपानामुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात; तसेच अर्धांगवायूचा झटका येण्याचे प्रमाण 24 टक्के आणि हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण नऊ टक्के वाढू शकत असल्याचे अभ्यासात आढळले आहे. रेड वाइन घेणे आरोग्याला चांगले असल्याचे काही शास्त्रज्ञांचे मत असले, तरी त्यात तथ्य नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. 

Web Title: Because of Heavy Drink Age will be reduces