पॉर्नसाइटस् पाहून विद्यार्थी बिघडतात : तारा केरकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांचे गुण आणि त्यांची घटणारी वैचारिक पातळी विविध प्रसंगामधून पाहायला मिळते. पोर्नसाइट्‌स पाहून विद्यार्थी बिघडत चालले असून, या साइट्‌सना बंद करण्यात यावे, अशी मागणी समाजसेविका तारा केरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. 

पणजी : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांचे गुण आणि त्यांची घटणारी वैचारिक पातळी विविध प्रसंगामधून पाहायला मिळते. पोर्नसाइट्‌स पाहून विद्यार्थी बिघडत चालले असून, या साइट्‌सना बंद करण्यात यावे, अशी मागणी समाजसेविका तारा केरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. 

तारा केतकर यांच्या सहकारी अँड्रिया परेराही उपस्थित होत्या. 
विद्यार्थ्यांच्या हातात लहान वयात इंटरनेटसारख्या सुविधा अगदी लहान वयात मिळत असल्याने त्यांना वाईट सवयी जडू लागल्या आहेत आणि त्यामुळे अभ्यासाचे आणि संपूर्ण भविष्याचे नुकसान होत चालले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांतील मुलांना सोशल मीडिया वापराबाबतीत योग्य आणि अयोग्य गोष्टींचे प्रशिक्षण देण्याची मागणी करणारे विनंतीपत्र आम्ही राज्य शिक्षण संचालनालयाला लिहिले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

Web Title: Because of Pornsites students gets misbehaviour says Tara Kerkar